prabodhini news logo
Home चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम

0
92

प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

चंद्रपूर १४ नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असुन त्यानुसार प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याचा दिनांक (२० नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक (२७ नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाननिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे (०५ डिसेंबर २०२५), मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे ०८ डिसेंबर २०२५, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे १२ डिसेंबर २०२५ असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here