
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – साऊ ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार 2025 हा मा. कु. सायली बाळू ढेबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे सामाजिक कार्य, कला क्षेत्रातील कामगिरी, पत्रकारिता, युवक क्रांती पोलीस मित्र, साहित्यिक क्षेत्रातील लेख कविता, व्याख्याने व सूत्रसंचालन अशा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील कौशल्य लक्षात घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात मा. मेघराजराजे भोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट कल्चरल चॅरिटेबल ट्रस्ट), मा.प्रा.डी. शंकर अंदानी(अध्यक्ष वर्ल्ड इंडियन ट्रस्ट, न्यू दिल्ली), मा.पुनम पाटील (पोलीस उपनिरीक्षक),मा.मृणाली कुलकर्णी (सिनेअभिनेत्री), मा. वैशाली शेलार(साहित्यिक व आहारतज्ञ), मा.युवराज कुमार (सिनेअभिनेता), मा.संदीप शर्मा (शिवसेना उपशहरप्रमुख, नाशिक), मा.विष्णू देशमुख (पोलीस सबइन्स्पेक्टर), मा.संभाजीराजे जाधवराव (लखोजी राजे जाधवराव यांचे चौदावे वंशज), मा. केतकी गावडे(अभिनेत्री मुंबई), मा.श्रीकांत जोगदंड(सामाजिक नेते), मा.नीता शेळके (उच्च न्यायालय नागपूर), मा.प्रा.डॉ. उल्हास मोगलेवार (ज्येष्ठ साहित्यिक नागपूर), मा.प्रफुल्ल सरोदे(स्वीय सहाय्यक),अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पुणे येथे पार पडणार आहे.















