
पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पोंभुर्णा परिसरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेली सर्व कामे ही जनतेचा पैशाची लूट ठराविक लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी रचलेली योजना असल्याचा गंभीर आरोप करत आहे मनीष राऊत यांनी आमदार साहेबांना चांगलेच कानपिचके दिले आहेत.
राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की – “हे विकासाचे काम नसून उघड उघड सुरु असलेली जनतेचा पैशाची लूट आहे. जनता मुकी बहिरी नाही… वेळ आल्यावर हिशोब घेईल.”
१) इको पार्क गार्डन – लाखोंचा उलाढाल आज कचऱ्याचा ढिगाऱ्यात बंद स्थितीत
इको पार्क गार्डन उभारण्यासाठी लाखो रुपये उडवले गेले, उद्घाटनाचा तमाशा झाला; आणि काहीच महिन्यात संपूर्ण ठिकाण ओसाड, बंद व नादुरुस्त.
हा सरळ-सरळ निधीचा अपव्यय नाही तर घोटाळाच, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
२) अगरबत्ती कारखाना – ग्रामीणांची आर्थिक लूट
अगरबत्ती कारखाना स्थापन करून तो एका मोठ्या व्यापाऱ्याकडे सोपवणे, आणि स्थानिक महिलांना फक्त 200–300 रुपये मजुरी देऊन काम करायला लावणे म्हणजे विकास नाही; हे गरीबांच्या कष्टांची उघड शोषणप्रणाली आहे.
याला विकास म्हणणे म्हणजे जनतेची थट्टा, असे राऊत म्हणाले.
३) हनी प्लांट – करोडोंची मशीन धूळ खात, सहा महिने ‘नो ट्रायल’
कोट्यवधींची मशीन, कच्चा माल व पॅकिंग मटेरियल मागवून सहा महिने ते मशीन चालू न करणे म्हणजे सरळसरळ सरकारी पैशांचा अपव्यय आणि कुणाच्यातरी खिशात गेलेली कमिशन.
“अशी प्रकल्पं फक्त कागदावरच असतात… प्रत्यक्षात काहीच नाही!” – राऊत.
४) रोड–नालीचा तातडीचा दिखाऊ कारभार, सिंचनाकडे दुर्लक्ष
पोंभुर्णा–केळझळ–जाणाडा मार्गावर सिमेंट रोड व नालीचे काम जोरात! पण हे काम
शेतकऱ्यांना शून्य उपयोगाचे आणि एका खाजगी सूरजगड कंपनीच्या सोयीचे असल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
शेतकरी पाण्यासाठी त्रस्त, उन्हाळ्यात गावोगाव पाण्याची टंचाई, सिंचन प्रकल्पांना शून्य गती; आणि उलट रोड–नालीच्या नावाखाली तातडीने कामे का?
“यामागे हितसंबंध आहेत… शेतकऱ्यांचे नाही, कंपनीचे!”
आमदार साहेबांना थेट आवाहन – “सिंचनाची कामे करा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल!”
राऊत यांनी कडक शब्दांत इशारा दिला—
“सिंचनावर लक्ष केंद्रित करा. शेतकऱ्यांना पाणी मिळणे हेच खरे विकासाचे काम आहे. जनतेचा पैसा आणि विश्वास दोन्ही वाया घालवू नका. जर अन्याय थांबला नाही तर जनता गप्प बसणार नाही.”















