prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली नगरपरिषद 2025 : प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना भाजपा कडून नगराध्यक्ष...

गडचिरोली नगरपरिषद 2025 : प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना भाजपा कडून नगराध्यक्ष पदाची पसंती

0
141

—शहरात उत्साहाचे वातावरण ! नव्या आशेचा शंखनाद

गडचिरोली – दि. १७ नोव्हेंबर २०२५ गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू,LLB- LLM उच्चशिक्षित आणि उत्साही तरुणी प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या नावावर भारतीय जनता पक्षाने शिक्कामोर्तब केले.
आज त्यांच्या उमेदवारीचे नामांकन मोठ्या जल्लोषात, कार्यकर्त्यांच्या जयघोषात आणि नागरिकांच्या उत्सुकतेच्या वातावरणात दाखल करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर भगवा झेंडा, ढोल-ताशांचा नाद, महिलांचा सहभाग, युवकांचा उत्साह, आणि वयोवृद्धांचा आशीर्वाद—असं अनोखं दृश्य पाहायला मिळालं.
*“नव्या नेतृत्वातून नव्या विकासाची गती” — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते*
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी प्रणोती निंबोरकर यांच्या उमेदवारीचे हार्दिक स्वागत करत सांगितले— “गडचिरोलीच्या नगरपरिषदेच्या मागील कार्यकाळात भाजपाच्या नेतृत्वाखाली शहराचा उल्लेखनीय विकास झाला. आता तरुण, अभ्यासू, उच्च विद्या विभूषित, ऊर्जावान, सर्वसमावेशक दृष्टी असलेल्या नेतृत्वाला आम्ही संधी दिली आहे. उर्वरित विकासकामांना नव्या वेगाने गती मिळेल. शहराचा चेहरामोहरा बदलेल. आणि जनता पुन्हा एकदा भाजपावर विश्वास टाकेल—हा माझा ठाम विश्वास आहे.”
ते पुढे म्हणाले—
“जनतेचा विश्वास आम्ही पावती करून दाखवू या निवडणुकीत नगराध्यक्षांसोबत बहुसंख्य नगरसेवकही विजयी होतील—याबाबत आम्ही सर्वजण एकदिलाने कार्यरत आहोत.”
*पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पक्षाचा ठाम विश्वास*
या उमेदवारीतून भारतीय जनता पक्षाने एक स्पष्ट संदेश दिला आहे—देशाचे लोकप्रिय, लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी तरुणाईवर दाखवलेला विश्वास आणि “युवा शक्ति – प्रगत भारताची गती” हा दृष्टीकोन आता स्थानिक स्वराज्यातही प्रभावीपणे राबवला जात आहे.
तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सतत गडचिरोली जिल्ह्याच्या उभारणीसाठी दिलेले प्राधान्य, विकास प्रकल्पांसाठीचा कौल, आणि तरुण नेतृत्वाला संधी—यांच्या धर्तीवर जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या भविष्यासाठी तरुण नेतृत्वाची निवड हा त्या विचाराचा प्रत्यक्ष नमुना ठरला आहे.
*प्रणोती निंबोरकर यांच्या उमेदवारीचे समर्थन व शुभेच्छा खालील मान्यवरांनी दिल्या—*
चिमुर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी *मान.श्री. बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया* यांनी या उमेदवारीचे स्वागत करत म्हणाले “शहराला नव्या उर्जेची, नव्या दृष्टीची गरज आहे. प्रणोतीत ती क्षमता आहे. युवकांचा उत्साह, महिलांचा विश्वास आणि पक्षाची ताकद—यामुळे या निवडणुकीत प्रचंड विजय निश्चित आहे.”
*आमदार डॉ. मिलिंद नरोटे* “शहराचा विकास आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तरुण नेतृत्वाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
*जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे* “पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो निर्णय घेतला, तो योग्य दिशेने उचललेला पाऊल आहे.
*माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे* “पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांच्या ऐक्याने वाढते. प्रणोती निंबोरकर यांच्या उमेदवारीमुळे पक्षात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.”
*नामांकन दाखल — उत्साह, जल्लोष आणि जनतेची अभिमानाची भावना*
प्रणोती निंबोरकर यांनी नामांकन दाखल करताच उपस्थित नागरिकांनी जयघोष केला.
डीजेच्या तालावर नाचणारे युवक, भगवा झेंडे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, आणि कार्यकर्त्यांचा अटळ उत्साह—संपूर्ण शहर मंत्रमुग्ध झाले होते.
भाजपाच्या नगरसेवक उमेदवारांचेही याच सत्रात नामांकन दाखल करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागत फलक, आणि नवी दिशा—नवा विकास या आशेने भारलेले चेहरे पाहून शहराचा माहोलच बदलेला दिसत होता.
*“जनसेवा हा ध्यास — गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय”*
प्रणोती सागर निंबोरकर यांच्या उमेदवारीमुळे युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तरुण नेतृत्वाकडून शहरवासीयांच्या अपेक्षा मोठ्या आहेत—रोजगार निर्मिती ,पाणीपुरवठ्याचे शाश्वत नियोजन,शहर स्वच्छतेसाठी नवी पद्धत,महिला सुरक्षा,युवकांसाठी सुविधा,वाहतूक व मूलभूत सुविधांचे आधुनिकीकरण
या सर्वांसाठी प्रणोती निंबोरकर यांची दृष्टी स्पष्ट असून त्यांना भाजपाचा मजबूत पाठिंबा आहे.
नागरिकांना विनंती — विकासाच्या रथाला आपला हातभार द्या डॉ. अशोकजी नेते यांनी शहरवासीयांना आवाहन केले “गडचिरोली शहरातील सर्व भावंडांनी भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. नव्या गडचिरोलीच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा. तुमच्या विश्वासानेच आमचा विकासाचा प्रवास पूर्ण होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here