prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माकडा माकडा हूप....

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माकडा माकडा हूप. (बालगीत)

0
77

माकडा माकडा हूप हूप
पाहुनी माझे मर्कट रूप.

हसाल तुम्ही खूप खूप
म्हणाल का मला भूप?

नाक माझे आहे नकटे
कोणी म्हणतात मला वकटे.

चालण्यातही वेगळ्या खोड्या
फांदी फांदीतून घेती उड्या.

ताजी फळे तोडून खातो
विहार करत आनंदी राहतो.

नाही चिंता नाही घोर
कौतुकाने पाही लहान थोर.

शेपटी माझी लांब लांब
मुले म्हणतात थांब थांब.

शेपटी तुझी बांधून ठेवू
शिक्षा तुला अशीच देऊ.

आम्ही तर श्रीरामाचे लाडके
शेपटीला बांधा खुशाल फडके.

याच शेपटीने लंका जाळली
प्रभू रामाची आज्ञा पाळली.

अहंकाराचा मी केलाय नाश
प्रभू रामाचा लाडका दास.

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here