
थेंब भर पाण्याची तहान पशु, पक्षी साऱ्यांची चिऊताई, खारुताई वाट कुणाची बघू नको वेळ नाही कुणाकडे तुमच्यासाठी अस समजू नको पाण्यासाठी पात्र बांधून पाणी टाकणं विसरतील
नका राहू तुम्ही विसंबून हार्डवर्क सोडून स्मार्टवर्क करा बघा जरा, तिकडे नळ आहे छोटा थेंब, थेंब, पाणी गाळत आहे नळावर तुम्ही बसा, जरा डोकं वाकवा एक थेंब पाणी, तुमची आहे तहान स्मार्टवर्क करून तहान स्वतःची भागवा
प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती















