
दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिवसाच्या निमित्ताने संविधान मसुदा समितीचे प्रमुख भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधान संक्षिप्त पुस्तिका वितरित करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय प्राचार्य एजाज शेख सर , प्रमुख मार्गदर्शक एल एल एम विभागप्रमुख प्रा. डॉक्टर पंकज काकडे सर, एलएलबी तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रमुख प्रा.डॉक्टर अभय बुटले सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. नंदकिशोर भंडारी यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य शेख सर बोलताना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की संविधान कितीही चांगले असेल तरीसुद्धा संविधान चालवणारे जर चांगले अधिकारी नसतील तर काही उपयोग नाही, भारत तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे तर सर्वांनी आपल्या योग्य शंभर टक्के सहभाग दाखवून स्वतःला आणि भारताला समृद्ध करावे, आपल्या प्रमुख मार्गदर्शन भाषणात मार्गदर्शन करताना डॉक्टर पंकज काकडे म्हणाले की मूलभूत हक्क तर महत्वपूर्ण आहेच परंतु त्यासोबतच कर्तव्याची जाणीव असणे फारच गरजेचे आहे आणि त्यांनी समोर बोलताना कर्तव्यनिष्ठ जर शिकायचे असेल तर आपण जपान कडून शिकले पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. महाविद्यालयातीलच विद्यार्थी श्री. विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविका सगळ्यांकडून वाचून घेतले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता सावंत यांनी तर यावेळी प्रगती उराडे यांनी गीत सादर केले आणि आभार प्रदर्शन नम्रता सुख देवे या विद्यार्थिनींनी केली. कार्यक्रमाला पाच वर्षीय अभ्यासक्रम प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मनीषा आवळे, डॉक्टर लीना लंगडे आणि डॉक्टर नंदिता नायर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.















