prabodhini news logo
Home ठळक बातम्या टाकळघाटमध्ये पाखंडीगिरीविरोधात भिमराज सेनेचे आंदोलन

टाकळघाटमध्ये पाखंडीगिरीविरोधात भिमराज सेनेचे आंदोलन

0
103

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे असलेल्या वित्तुबाबा या मंदिरात मोठ्या प्रमाणात पाखंडी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष करून तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्तींसमोरच हे अंधश्रद्धेचे कृत्य सुरू असल्यामुळे समाजमनात संतापाची लाट उसळली आहे.

येथे “मूल होत नाही”, “भूतबाधा आहे”, “अंगात येते” अशा कारणांनी लोकांना दिशाभूल करून पाखंडी उपचारांचे नाट्य केले जाते. आरती, भोंदू विधी आणि खोटे चमत्कार दाखवून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही अत्यंत शोकांतिका आहे, कारण ज्या नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पवित्र बुद्ध धम्म दिला, त्या भूमीतच असे अंधश्रद्धेचे प्रकार उघडपणे सुरू आहेत. “कट्टर आंबेडकरवादी” म्हणवणाऱ्या समाजानेही या अन्यायाकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त होत आहे.

बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते —
“मी ज्या समाजात जन्मलो, त्या समाजासाठी काही करू शकलो नाही, तर स्वतःला गोळी घालून घेईन.”
हा संदेश आजही जागा करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर भिमराज सेना, महाराष्ट्र या पाखंडीगिरीविरोधात मोठे आंदोलन करत आहे. सेना प्रमुख जयाताई बनसोडे यांनी जाहीर केले आहे की,दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता टाकळघाट, नागपूर येथे वित्तुबाबा मंदिराच्या व्यवस्थापन समितीला निवेदन देण्यासाठी आणि कारवाईची मागणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भेट व आंदोलन आयोजित केले आहे.

ज्यांना समाजातील अंधश्रद्धेविरोधातील या लढ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here