prabodhini news logo
Home ठळक बातम्या कु. सायली ढेबे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

कु. सायली ढेबे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

0
132

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – सिटी इंडिया न्यूज व मा.श्री आप्पा पांचाळ यांच्या कार्यकारी अध्यक्षतेखाली मा. कु. सायली बाळू ढेबे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे सामाजिक कार्य, कला क्षेत्रातील कामगिरी, पत्रकारिता, युवक क्रांती पोलीस मित्र, साहित्यिक क्षेत्रातील लेख कविता, व्याख्याने व सूत्रसंचालन अशा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील कौशल्य लक्षात घेऊन हा पुरस्कार त्यांना मिळाला.
हा पुरस्कार सोहळा मा. मेघराज राजे भोसले (मराठी चित्रपट महामंडळ,अध्यक्ष), मा. तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेड, अध्यक्ष), मा. अनिकेत घुले (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवभक्त फाउंडेशन), तसेच मा. तुकाराम सुतार (सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक,सिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष), यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे येथे प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here