prabodhini news logo
Home चंद्रपूर म्हाडा कॉलोनीतील बुद्ध मूर्ती प्रकरणात १८ लोकांची जिल्हा सत्र न्यायालयाने केली मुक्तता.

म्हाडा कॉलोनीतील बुद्ध मूर्ती प्रकरणात १८ लोकांची जिल्हा सत्र न्यायालयाने केली मुक्तता.

0
91

Chandrapur – मागील १२ वर्षांपासून सुरू असलेल्या चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीत दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायाधीश मा. मुठाळ साहेबांनी निकाल दिला व सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.
२०१४ रोजी दाताळा येथील म्हाडा कॉलोनीच्या खुल्या जागेवर बुद्ध मूर्ती व पंचशील ध्वज स्थापन करण्यात आलेला होता, याप्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला व म्हाडाने रामनगर पोलिस ठाणे येथे तक्रार केली. रामनगर पोलिस ठाणे येथे जमावावरती पोलिसानं कडून लाठी चार्ज देखील करण्यात आला. एकूण १८ लोकांवरती पोलिसांनी FIR करून, त्याच्यावरती गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये भंते अनिरुद्ध, मय्यत रामदासजी वनकर, इंजि. तथागत पेटकर, देशक खोब्रागडे, नगरसेवक अनिल रामटेके, राजू झोडे, अशोक घोटेकर, माया वनकर, अशोक लोणारे, कांचन लोणारे, भास्कर खडसे, आम्रपाली खडसे, अर्चना रामटेके, कल्पना चिवंडे, शैला डोके, गीता पारखी, सचिन ठमके, नंदा देशकर आदींना आरोपी करण्यात आलेले होते.
न्यायालयामध्ये १८ आरोपी करण्यात आलेल्या लोकांच्या वतीने वरिष्ठ वकील मा. राजू सागोरे आणि वकील मा. जगदीश खोब्रागडे यांनी भक्कमपणे आरोपीची बाजू मांडली. आजचा निकालाने सर्व १८ आरोपींना दिलासा मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here