prabodhini news logo
Home गुजरात भाजप नेत्याची असंवेदनशीलता; भाजप अध्यक्ष नड्डांच्या समोर कमांडो बेशुद्ध, नेत्याने फिरवली पाठ;...

भाजप नेत्याची असंवेदनशीलता; भाजप अध्यक्ष नड्डांच्या समोर कमांडो बेशुद्ध, नेत्याने फिरवली पाठ; वडोदरा घटनेने संताप.

0
132

वडोदरा: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता मार्च’ कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत एक अत्यंत धक्कादायक आणि असंवेदनशील घटना घडली आहे. नड्डा यांचे भाषण सुरू असताना स्टेजसमोर उभा असलेला ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेतील एक कमांडो अचानक खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला.
मात्र, या गंभीर घटनेनंतरही जे.पी नड्डा यांनी आपले भाषण थांबवले नाही, तसेच मंचावरील एकाही नेत्याने मदतीसाठी धाव घेतली नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय घडली?
वडोदरा येथे आयोजित कार्यक्रमात जेपी नड्डा यांचे भाषण सुरू होते. उभा असलेला एक सुरक्षा कमांडो आजारी पडून जमिनीवर कोसळला. उपस्थित लोकांनी तातडीने मदतीची अपेक्षा केली, परंतु पुढे जे घडले ते पाहून उपस्थितांना धक्का बसला.
कमांडो बेशुद्ध पडल्यानंतरही जेपी नड्डा यांनी क्षणभरही न थांबता आपले भाषण चालूच ठेवले. तसेच मंचावर बसलेल्या भाजपच्या एकाही नेत्याने खाली पडलेल्या त्या जवानाच्या मदतीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा मदतीची साधी विचारणाही केली नाही.
शेवटी, एका पत्रकाराने आपला कॅमेरा खाली ठेवून तातडीने त्या बेशुद्ध जवानाकडे धाव घेतली आणि त्याला मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इतर काही सुरक्षा रक्षक तिथे आले आणि त्यांनी त्या जवानाला उचलून उपचारासाठी नेले.
भाजपवर टीकेची झोड
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून भाजपवर निर्दयी असल्याचा आरोप केला जात आहे.
ही माणुसकी फक्त प्रचारासाठी असते का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. भाजपच्या नेत्यांच्या मनात मनुष्यत्व नाही का, भावना नाहीत का, असा संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here