prabodhini news logo
Home अकोला अंजली आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप

अंजली आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप

0
80

अकोला : वंचित बहुजन आघाडी अकोला पूर्व तर्फे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाढदिवसाचा आनंद केवळ औपचारिक सोहळ्यात न साजरा करता समाजहिताची भावना जोपासत मेन हॉस्पिटल जीएमसी, अकोला येथे थंडीच्या लाटेत गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर दिलासा व आनंद पसरला.
या सामाजिक कार्यात अकोला पूर्व वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानगर महासचिव मनोहर बनसोड यांनी भूषविले.
त्यांच्यासोबत पराग गवई, सुरेश मोरे, विजय नरवाडे, अमोल कलोरे, सुरेश कलोरे, संदीप शेरेकर, आकाश दादा शिरसाट, प्रबुद्ध भारतचे प्रतिनिधी भगवान उमाळे, गोरखनाथ वानखेडे, शंकरराव इंगोले, ठोसर, राजू मुदावले, रायबोले, थोरात साहेब, मेश्राम, मुकुंद सातपुते, गोलू खिल्लारे, नितीन प्रधान, निल सोनवणे, शिरसाट मेजर, महेंद्र डोंगरे, सुमित गवारगुरु, मोहन येवले, पुरुषोत्तम वानखडे इत्यादी कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here