prabodhini news logo
Home गडचिरोली तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नीतीमुळे “गडचिरोली” शहराच्या विकासाला ग्रहण

तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नीतीमुळे “गडचिरोली” शहराच्या विकासाला ग्रहण

0
98

देश व राज्यातील महायुती सरकार मनुवादी विचाराचे सरकार असून हे बहुजन आरक्षण, त्यांच्या विकासाचे विरोधक आहेत. सत्तेमधील महायुती लुटारू सरकारने संपूर्ण राज्य कर्जाच्या खाईत लोटले, सुरजागड प्रकल्पात स्थानिक युवकांना काम दिले जात नाही.
येथील खनिज संपत्तीची लूट सुरू आहे, सोबतच लाडक्या बहिणीच्या नावाने फसव्या योजना काढून जाचक अटी घालून त्या गुंडाळू पहात आहे. तर याच भाजप वाल्यांनी गडचिरोली नगरपरिषदेवर मागील काळात सत्ता काबीज करताच जनसामान्यांच्या समस्यांना बगल देत ठेकेदार पदाधिकाऱ्यांनी संगणमत करून प्रचंड भ्रष्टाचार केला, त्यामुळे संपूर्ण गडचिरोली शहराचा विकास खुंटला.
बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूची दरवाढ, प्रचंड महागाई यातून जनतेचे शोषण करणाऱ्या आणि निवडणूक येताच पैशाच्या व सत्तेच्या बळावर मतदारांना दमदाटी, प्रलोभने देऊन पुन्हा सत्ता प्राप्तीची स्वप्ने रंगविणाऱ्या भाजप व त्यांच्या युतीतील सर्व पक्षांना धडा शिकविण्यासाठी येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच विजयी करून आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाची दारे उघडावी असे आवाहन केले.
सोबतच काँग्रेसची सत्ता आल्यास गडचिरोली शहरात सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमांचे मोफत शिक्षण, होतकरू शिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अशी इ लायब्ररी, शुद्ध पेयजल, प्रशस्त रस्ते, पथदिवे यासह अनेक जनकल्याणकारी योजना राबविणार आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा निवडणूक निरीक्षक संदेश सिंगलकर, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, ॲड.राम मेश्राम, मनोहर पाटील पोरेटी, विश्वजित कोवासे, प्रकाश इटनकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, यांचेसह प्रभाग २ , ४ व १० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here