prabodhini news logo
Home चंद्रपूर भाजप सत्ताकाळात देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या व महिला अत्याचार; मुल येथील जाहीर...

भाजप सत्ताकाळात देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या व महिला अत्याचार; मुल येथील जाहीर प्रचार सभा…

0
110

केवळ विकासाच्या थापा देऊन भाजप देशासह राज्यातील जनतेला मूर्ख बनविण्याचे काम करीत आहे. महागाई,बेरोजगारी यामध्ये जनता होरपळत असताना केवळ लाडकी बहीण सारख्या फसव्या योजनांचा लॉलीपॉप दाखविल्या जात आहे.
आज संपूर्ण राज्यावर कर्जाचे डोंगर उभे ठाकले असून देश व राज्यातील भाजप सरकार काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या व महिला अत्याचार होत आहे. अशा थापड्या सरकारला गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्तेतून हाकलून लावायचे असल्याने याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता देऊन करा.
आपल्या शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोषसिंह रावत, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील, राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गुरुदास गुरनुले, प्रशांत समर्थ, प्रशांत उराडे, राजेश कन्नमवार, शेरकी सर, घनश्याम येनुरकर, पवन नीलमवार, रूपाली संतोषावार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ, काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, तालुका काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here