
चंद्रपूर शहर महिला कांग्रेस चे खासदार मा.प्रतिभा धानोरकर यांना निवेदन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर शहरातील अनेक गरजू लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निराधार निवृत्ती योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना इत्यादि केंद्रपुरस्कृत योजनाची नोंदणी करताना लाभार्थ्यांचे एकदा आधार कार्ड वेरीफाय झाल्यावर दुसऱ्यांदा वेरिफाय होत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.
जोपर्यंत नॅशनल सोशल असिस्टेंट प्रोग्राम (NSAP )या पोर्टल वर सुधारणा करणार नाही तोपर्यंत गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्याना वरील योजनेचा लाभ मिळत होता त्याना सुद्धा डिसेंबर 2023 पासून गरजू लाभार्थाचे अनुदान थकीत आहे त्यामुळे गरजू लाभार्थी शासकीय कार्यालयात अनुदान मिळावे यासाठी चकरा मारून त्रस्त झाले असून प्रचंड मानसिक तणावात आहे.
तरी या अतिशय गंभीर विषयाची दखल घेऊन केंद्र पुरस्कृत योजनेची नोंदणी राज्य पुरस्कृत महाडीबीटी पोर्टल वर करावी किवा इतर माध्यमातून ही गंभीर समस्या सोडवून गरजू लाभार्थ्यांना न्याय द्यावा असी आग्रही मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस कमिटी च्या अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार मा. प्रतिभा धानोरकर तसेच जिल्हाधिकारी मा.विनय गौडा यांना दिले.
मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरील समस्या सोडविण्याचा विश्वास व्यक्त केला.















