prabodhini news logo
Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधानावर प्रबोधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधानावर प्रबोधन

0
95

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत तालुका व जिल्हा चंद्रपूर च्या वतीने महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख बबन जोगदंड,निबंधक विशाल लोंढे, प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर तालुक्यातील समतादूत माधुरी उराडे यांच्या मार्फत 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान जागर सप्ताह राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधानावर आधारित प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली त्या नंतर मूलभूत अधिकार व नागरिकांची कर्तव्य यावर मार्गदर्शन करण्यात आले नंतर उपस्थित विध्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली यावेळी कनिष्ठ महाविद्यालयचे प्रमुख प्रा. राहुल मानकर, प्रा योगपती बारसागडे, मालोकर,प्रा .चितलांगे,मोडकर, कूचनकर सोनटक्के कटंगकर तसेच इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बारसागडे तर आभार सोनटक्के मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here