
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत चंद्रपूर तालुक्यात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान जागर सप्ताह राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील समतादूत माधुरी उराडे यांनी राणी दुर्गावती शासकीय ITI चंद्रपूर येथे संविधानावर आधारित प्रबोधन कार्यक्रम घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली त्या नंतर हिंदु कोडबील मधील महिलांचे हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन करण्यात आले नंतर विध्यार्थिनींची गीतगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , घेण्यात आली यावेळी गट निदेशक धनविज, मॅडम,शिल्प निदेशक, प्रज्ञा साव, मंगला खणके, मेघा जंगम, शीतल सिडाम, अंकिता बोधे, अश्विनी उमरे व इतर शिल्प निदेशक तसेच सहकारी कर्मचारी उपस्थित होते.















