
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ६ डिसेंबर २०२५ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुउद्देशीय सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक भैयालाल कुरसंगे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीता राऊत यांनी केले. अभिमन्यू वाटगुरे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय देत त्यांच्या महान कार्याची उजळणी केली. प्रमोद शंभरकर यांनी आपल्या मनोगतात “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या मार्गदर्शक विचारांवर भाष्य केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत मांडून आंबेडकरी विचारांना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक भैयालाल कुरसंगे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून हरेश कामडी, अरुण कायंदे, धनश्री परतेती,मनोज गजभिये, प्रमोद शंभरकर, अभिमन्यू वाटगुरे, राहुल अंधारे, क्रीष्णा गावळे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन,सुमन अडभैया, गीता राऊत,भारती साखरकर, मनोज आचार्य, चंद्रकला पटले, दोनाडकर, प्रथमेश पाथोडे,आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात कुरसंगे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी कोल्हे इयत्ता १२ वी ची विद्यार्थ्यांनी हिने केले.अमित्रा कांटेगे हिने आभार प्रदर्शनाचा समारोपही सुसंवादी वातावरणात करण्यात आला.















