
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानून जनसेवेचा व्रत अंगिकारलेले विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस ब्रम्हपूरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने ब्रम्हपूरी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण करण्यात आले. सोबतच शहरातील निराश्रित व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना ब्लॅंकेटचे देखील वितरण करण्यात आले.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघांच्या लोकप्रतीनीधीत्वाची सूत्रे सांभाळली तेव्हा पासूनच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सामान्य, गरीब, वंचित माणसाची सेवा करण्यासाठी त्यांनी आपला हात नेहमीच पुढे ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस देखील सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय ब्रम्हपूरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

याप्रसंगी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, काॅंग्रेस प्रदेश सचिव डॉ थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष योगेश मिसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ खंडाळे, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कामडी, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्ष योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनिता तिडके, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, जिल्हा काॅंग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, ओबीसी सेलचे उमेश धोटे, शहर काँग्रेस सचिव वकार खान, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, ब्रम्हपूरी बिगरशेती संस्था अध्यक्ष अनिल दोनाडकर, जिल्हा काॅंग्रेस सहसचिव गाजी पटेल, माजी नगरसेवक संजय ठाकुर, माजी नगरसेवक मनोज कावळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राकेश पडोळे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवी पारधी, इक्बाल जेसानी, जयश्री कुथे, अनुसूचित जाती सेल जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, तालुका काँग्रेस सहसचिव अमित कन्नाके, शहर काँग्रेस सहसचिव सोमेश्वर उपासे, माजी नगरसेवक सागर आमले, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल विखार, राजेश तलमले, गिरीश बुराडे, सारंग बनपुरकर, सुधीर शिवरकर, रिंकूभाऊ पठाण, वसंत ज्ञानवडकर, मुर्लीधर शिवुरकार, प्रशांत करपे, आशिष देशमुख, प्रणय सोंदरकर, कार्यालय प्रमुख सुधीर पंदीलवार, झलके सर,वैष्णवी आमले यांसह काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















