
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पॅसिफिक क्रीडा फेडरेशन च्या वतीने ३ री नॅशनल ओसियन क्रीडा स्पर्धा २०२५ आंध्रप्रदेश येथील के व्हि. के. स्टेडियम आत्माकूर जिल्हा नांदयाल येथे अंडर १७ मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघात भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा येथील रहिवासी सिद्धेश सुरचंद राघोर्ते यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र फुटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यात सिद्धेश सुरचंद राघोर्ते यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यावेळी महाराष्ट्र संघाने छत्तीसगड, पंजाब, ओरिसा, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश या संघाचा पराभव करून महाराष्ट्र संघाने धवधवित यश संपादन केले आहे.
सिद्धेश राघोर्ते हा सेंट मेरीस इंग्लिश स्कूल येथे इय्यत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय टिम व्यवस्थापक श्वेता शहारे, प्रशिक्षक साक्षी राहुल भोंदे, कॅप्टन अनर्व तिवारी, प्राचार्या ज्योती दुबे व आई- वडील यांना दिले आहे.
सिद्धेश राघोर्ते यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य रजनिश बन्सोड, सुरेवाडा येथील सरपंच दिक्षा सुखदेवे, पोलिस पाटील मंगला राघोर्ते, विलास केजरकर, हितेश सेलोकर, अज्ञान राघोर्ते, प्रभू फेंडर, अमरकंठ राघोर्ते, चंद्रशेखर खराबे, पिंटू बांते, अनिल खराबे, व चाहत्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.















