prabodhini news logo
Home ठळक बातम्या महिला बचत गटातर्फे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन..

महिला बचत गटातर्फे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन..

0
81

सामूहिक सक्षमीकरणातून महिला मुक्ती दिन साजरा..

मुलींचे हक्क जागरूक करून बालिका दिन साजरा..

साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क

साकोली/भंडारा – ४ जाने. २०२६ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त, ३ जाने. रोजी महिला बचत गट शंकरपुर/वडेगांव येथील महिलांनी, बौद्ध विहार परिसरात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले व मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून स्त्रियांनी सामूहिक सक्षमीकरणातून आपले हक्क, न्याय, समानता व सामाजिक व आर्थिक समता सक्षम करण्यासाठी चर्चा करून जनजागृती केली. तर बालिका दिनानिमित्त मुलींना एकत्रित गोळा करून त्यांना त्यांचे हक्क, शिक्षण व आरोग्याचे महत्व समजावून सांगितले व मार्गदर्शन केले व अशा प्रकारे बालिका दिन साजरा करण्यात आला.

प्रसंगी नवरत्न महिला बचत गटातील सर्व महिला पदाधिकारी व इतरत्र गटातील महिला अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव व खनिजदार त्याचप्रमाणे गावातील लहान मुली देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम राबविल्याने महिलांचे सक्षमीकरण अजून दृढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे तर जनतेकडून महिलांचे सर्वत्रचं कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here