
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दिनांक- 17 जानेवारी 2026 रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स, पुणे या आमच्या संस्थेने 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा एग्झिट पोल प्रदर्शित केला. सर्वेक्षण, ग्राउंड इंटेलिजन्स आणि डेटा संशोधनाच्या माध्यमातून संस्थेने 29 महानगरपालिका निवडणुकीच्या विविध पैलूंवर सखोल अभ्यास करून अंदाज वर्तवला. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागांसंदर्भातील आमचा एक्झिट पोल अचूक ठरला होता. याशिवाय, त्याआधी महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकांमधील अंदाजही खरा ठरला होता.
‘रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स’ संस्थेची सातत्यपूर्ण कामगिरी, जमिनीवर आधारित असलेली संशोधन पद्धती आणि डेटावर आधारित विश्लेषण यामुळे बहुतांशी महानगरपालिकांचा अंदाज अचूक ठरला आहे.
‘रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स’नुसार राज्यातील मुंबई, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सांगली, धुळे, अहिल्यानगर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि पनवेल या 10 महानगरपालिकांमधील अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. तसेच राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, जळगाव, सोलापूर, मिरा भायंदर, नांदेड, लातूर, इचलकरंजी आणि जालना या 11 महानगरपालिकांमध्ये कुठल्या पक्षाला बहुमत मिळू शकेल, हा अंदाज अचूक ठरला आहे. तर वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी, अमरावती, अकोला, मालेगाव आणि परभणी या 7 महानगरपालिकांमध्ये कोणता पक्ष आघाडीवर राहू शकेल, हा अंदाज अचूक ठरला आहे.















