prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – औक्षण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – औक्षण

0
90

मोठ्या मनाची बहिण
करीते औक्षण तुला
राहो माझा बंधु सुखी
हेच मागणे देवाला।।२।

काही नको बंधुराया
नको मला साडी चोळी
वेड्या बहिणीची माया
आहे किती साधी भोळी।।३।।

तुझी साथ अनमोल
मिळावी जीवनभर
एवढ्या माझ्या प्रेमाला
जन्मभर हृदयी धर।।४।।

पाठीराखा माझा भाऊ
आहे जगामध्ये भारी
आभाळा एवढी माया
त्याची आहे माझ्यावरी।।५।।

कमी नको करू कधी
तुझी समिंदर माया
तुझ्या सावलीत ठेव
जन्मोजन्मी भाऊराया।।६।।

प्रा. कु. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here