prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते

0
65

वैवाहिक जीवनातील प्रेम
सदैव फुलतच रहावे
संसारातील सुखदुःखात
अनोळखी नाते उलगडावे

वय कोणतेही असूद्या
प्रेमाचा क्षण वेचावा
मोगऱ्याचा सुवासिक गजरा
केसात माळूनी घ्यावा

बंध रेशमाचे मखमली
हळुवार तू सोडवावे
तुझ्या प्रीतीत राया
मी स्वतःला गुंतवावे

झेलीले अनेक संघर्ष
कठीण समयी दिली साथ
आता थकलो जरी देहाने
सुखी क्षण जगुया नाथ

केसातील रुपेरी बटाना
यावी झळाळी तुझ्या स्पर्शाने
मी मोहरुन जावे अलवार
प्रीत फुलावी नव स्पंदनाने

सौ.वंदना पाटील, मुंबई 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here