prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड

भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड

0
70

कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – भारतीय जनता पार्टीच्या वतीने 24 नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली असून शेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी नागपूर येथील विभागीय कार्यालयात भाजपचे 23 आणि मित्रपक्षाचा 1 असे एकूण 24 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली.
गटनेतेपदी इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश नेतृत्वाने सहमती दर्शवत शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, सोमवारी सर्व 24 नगरसेवकांनी नागपूर विभागीय कार्यालयात उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत गटाची स्थापना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here