prabodhini news logo
Home ठळक बातम्या वसुधा नाईक यांना २०२६ चा तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कार

वसुधा नाईक यांना २०२६ चा तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कार

0
81

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – तितिक्षा इंटरनॅशनल संस्था, पुणे याच्या संस्थापिका प्रिया प्रमोद दामले या आहेत.अजया आणि अजिता मुळीक या संस्थेच्या सर्वेसर्वा आहेत.
दि. २२/०३/२०२६ रोजी तितिक्षा कला संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यामध्ये अनेक पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये काव्य लेखन पुरस्कार, मातृ गौरव पुरस्कार होते.
मातृ गौरव पुरस्कार मध्ये जवळजवळ चाळीस पुरस्कार दिले.त्यात वसुधा नाईक, पुणे यांनाही मातृगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
युगंधरा प्रकाशन संभाजीनगर यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्यात नीला चित्रे यांची “इचपूर्ती” आणि “अभिलाषा” ही दोन पुस्तके होती.
प्रमुख पाहुणे म्हणून न्या. मा. अमृत बिराजदार, शोभा जोग, सुभेदार- महेंद्र गवई, राजेंद्र खर्डे वेसावकर, विजय पटवर्धन, शंकर अंदानी, शहाजीराव पाटील, तृप्ती देसाई, मधुसूदन घाणेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र गाडगीळ, अमोल काळे, सुनिता कावसनकर, अनिता टिळेकर, सुजित दातार, विठ्ठल मुरकेवार, भालचंद्र शिर्के, आर्यन खैरे, निलेश दातार इत्यादी सन्माननीय अतिथी उपस्थित होते.
कार्यक्रम खूपच सुरेख अखीव रेखीव झाला. महाराष्ट्रातून आलेल्या कवींचे काव्य संमेलन झोकात पार पडले.यात प्रामुख्याने हास्य कविता, वारकरी संप्रदाय या वर कविता, परीक्षेचा काळ चालू आहे त्यावर कविता अशा विविध सुंदर कविता सादर झाल्या. प्रिया मॅडमचा ५० सावा वाढदिवस नुकताच पार पडला त्यावरही कविता सादर झाल्या.कार्यक्रमाच्या शेवटी सरप्राईज गिफ्ट पण देण्यात आले.
प्रिया दमले यांनी अतिशय बहारदार भाषेत सूत्रसंचालन तर केलेच पण सर्व सूत्रे अतिशय छान सांभाळली. प्रिया दामले यांच्या साथीने प्रमोद कुलकर्णी व विजय सातपुते यांनी देखील बहारदार सूत्रसंचालन केले.
प्रिया दामले यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करते. गौरव आणि मयुरी तसेच दीपाराणी गोसावी व अशा अनेक हातांची मदत होती. या कार्यक्रमाची तयारी गेली दोन महिने चालू होती. अतिशय नियोजनबद्ध, शांततेत कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here