prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रभू रामचंद्रांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन; १०१ जोडप्यांच्या हस्ते होणार रामललाची महाआरती!

प्रभू रामचंद्रांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन; १०१ जोडप्यांच्या हस्ते होणार रामललाची महाआरती!

0
120

भुवनेश्वरी धर्मपुरीवार
चंद्रपूर रिपोर्टर
प्रबोधिनी न्यूज
९६३७२६३९६४

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. प्रभू राम नवमीनिमित्त संपूर्ण विदर्भाची शान असलेली प्रभूंची भव्य शोभायात्रा गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. श्री. कालाराम मंदिर येथून निघणाऱ्या या वैभवशाली सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
१०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती
यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे दुपारी ठीक ३ वाजता १०१ जोडप्यांच्या हस्ते प्रभू रामललाची भव्य आरती पार पडणार आहे. ज्या भाविकांना या महाआरतीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्वरित ९६३७२६३९६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नियोजनासाठी झाली अंतिम सभा
या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी रविवार, २२ मार्च २०२६ रोजी रामाळा तलाव जवळील श्री जालाराम मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शोभायात्रेचा मार्ग, शिस्त आणि इतर नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वेळेचे पालन करण्याचे आवाहन
शोभायात्रेचा प्रारंभ सायंकाळी ठीक ५ वाजता श्री. कालाराम मंदिर येथून होणार आहे. तरी सर्व रामभक्तांनी वेळेचे विशेष पालन करून या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे. तसेच आपल्या शोभायात्रेतील नियोजनाची माहिती वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या सोहळ्यात सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा आणि सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here