
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे दिनांक 20 मार्च रोजी प्राणीशास्त्र विभागातर्फे “जागतिक चिमणी दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. हुमेश आनंदे, प्रा.डॉ. निलेश ठवकर, प्रा.डॉ. बिजन कुमार शील व प्रा.डॉ.सुमेध वावरे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्राणीशास्त्र विभागातर्फे चिमण्यांसाठी व इतर पक्षांसाठी पाणी पिण्यासाठी झाडाला बांधून पाणवठे तयार करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांनी उन्हाळ्यामध्ये पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. निलेश ठवकर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व प्रा. डॉ. सुमेध वावरे यांनी केले. याप्रसंगी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे पानवठे तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.















