prabodhini news logo
Home ठळक बातम्या नाशिक हादरले! दिंडोरीत कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा...

नाशिक हादरले! दिंडोरीत कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश

0
85

नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिंडोरी:नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात असलेल्या राज बँक्वेट हॉलमध्ये आयोजित एका स्नेहसंमेलनावरून (Reunion) घरी परतत असताना दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगतच्या उघड्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील नऊही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण


घटनेचा तपशील:
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमासाठी दिंडोरीत आले होते. कार्यक्रम संपवून रात्री १० च्या सुमारास आपल्या मारुती सुझुकी अर्टिगा (MH 15 JS 1053) कारने ते घरी परतत होते. शिवाजीनगर भागात अंधार असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याशेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली.
मृतांची नावे:
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत:
सुनील दत्तू दरगोडे (३२)
रेश्मा सुनील दरगोडे (२७)
आशा अनिल दरगोडे (३२)
खुशी/सृष्टी अनिल दरगोडे (१४)
माधुरी अनिल दरगोडे (१३)
श्रेयस अनिल दरगोडे (११)
राखी (गुणवंती) सुनील दरगोडे (११)
श्रावणी अनिल दरगोडे (११)
समृद्धी राजेंद्र दरगोडे (७)

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शहीद दिन


बचावकार्य:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने भरलेली असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे आले. अखेर क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता.

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन


प्रशासकीय मदत आणि चौकशी:
या घटनेवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. “रस्त्याच्या मध्यभागी किंवा लगत उघडी विहीर असणे ही प्रशासकीय चूक असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावावर शोककळा पसरली असून, उघड्या विहिरींच्या सुरक्षिततेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here