prabodhini news logo
Home एटापल्ली एटापल्लीचा जनतेला अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध भाकपाची तक्रार

एटापल्लीचा जनतेला अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध भाकपाची तक्रार

0
105

एटापल्ली प्रतिनिधी – एटापल्ली येथील प्रभाग क्रमांक 10 व 12 मध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत अनियमित व सतत खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दिवसा वीज ये-जा करत असते, तर रात्री पूर्णपणे वीजपुरवठा खंडित राहतो. त्यामुळे उकाड्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये दररोज रात्री वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याबाबत संबंधित लाईनमन व ज्युनियर इंजिनिअर यांना वारंवार फोनद्वारे माहिती देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अधीक्षक अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल., गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य:
“एटापल्ली प्रभाग क्र. 10 व 12 मधील नागरिक मागील तीन दिवसांपासून भीषण वीज समस्येला सामोरे जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. सध्या परिस्थिती अशी झाली आहे की काही कर्मचाऱ्यांमध्ये कामाबाबत डीलेपणा आला असून त्यांना कोणतीही भीती उरलेली नाही. यामुळे या विभागाचे काम अत्यंत निष्कृष् दर्जाचे झाले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा.”

भाकपाने पुढील मागण्या केल्या आहेत:

* निष्काळजी कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करावी
* प्रभाग क्रमांक 10 व 12 मध्ये नियमित व सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा
* नागरिकांना होणारा त्रास त्वरित थांबवावा

ही समस्या गंभीर असून प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here