prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलमोहर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलमोहर

0
6

बहरला गुलमोहर विविध रंगात
प्रसन्न झाले वातावरण ग्रीष्मात
उन्हाळ्याच्या या गरम झळ्यात
फुलतो गुलमोहर थाटात…….!!

जिकडे तिकडे चोहीकडे
विविध रंगी गुलमोहर फुले
हिरव्या हिरव्या पानांमधुनी
लाल,पिवळे फुले उठून दिसे…..!!

रस्त्याच्या कडेला गुलमोहराचे झाड
गोल गोल घुमटासारखा आकार
विविध रंगाने नटलेला हा वृक्ष
गुलमोहर दीसतो बहारदार……!!

तप्त झळा सहन करून
दिसतो तो हिरवा हिरवा गार
पहा कसा उभा थाटात
दिसतो तो सुंदर फार…..!!

गुलमोहरा कडे पाहताच
मन भारावून गेले
सावलीत त्याच्या उभे राहता
भासे जणू मी,वधूमंडपी आले…..!!

सौ. रंजना धर्मपाल आटे
वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here