prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा

0
6

उंबरठा म्हणजे संस्कार कुंपण
घातलेले मनाने मनाला गोंदण

सर्वांनाच आहे त्याचे दडपण
पण पुरुषांने दिले आहे झूगारून

आहे उंबरठ्याचे बंधन  फक्त स्त्रीला
ओझे अपेक्षांचे तिनेच मानावे समाज वदला

अघटित घडता दोष फक्त मुलीचा
नसतोच बंधने नाकारणाऱ्या समाजाचा

उंबरठा नियम पाळावे समाजाने
परंपरा, संस्कृतीचे महत्व आचरणे

मर्यादेचे उंबरा ठरतो  वेसण
वादळापासून करतो रक्षण

पाठवणी लेकीची  उंबरा रडतो
आगमने सुनेच्या हर्षित होतो

दुडू दुडू धावती नाजूक पावले
अडवतो उंबरा  माझ्या लाडक्या बाळे

परदेशी जाता उंबऱ्याचे डोळे ओले
वाट पाहता त्याची, तो झणी वळे

माय तात भक्ती मुळे विठ्ठल ताटकळला
विटेवरी उंबऱ्यात वाट पहात उभा ठाकला

(स्वरचित)
©® नीला चित्रे 
चिंचवड पुणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here