prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – उंबरठा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – उंबरठा

0
5

चुल आणि मुल यात नाही राहीली स्त्री आज
तरीही का लेखतो कमी आजही तिला समाज

तिने घेतली उंच भरारी चंद्रावरही टाकले पाऊल
शिक्षणाने केले सक्षम तिच्या अस्तित्वाची चाहूल

रायगडावर चढली जिद्दीने लेकरासाठी प्रेमळ माय
जगण्याच्या कठीण समयी तिच्या हाती प्रत्येक उपाय

जिद्दीने ती लढली लढाई,स्वातंत्र्याचा घेतला वसा
उंबरठ्या बाहेर पाऊल जोपासली ज्ञान जिज्ञासा

लेखणीत तिच्या सावित्री, अहिल्याची हाती तलवार
रणागंणी रणरागिणी, सांभाळते घर प्रपंच कारभार

उंरठ्याबाहेर धैर्य कधी स्वयपाकघरात ती सुगरण
देश विदेशात गाढून झेंडे संस्कारी जपते स्त्री मन

पराक्रमाची उभारून गुढी,तीची चाल सातासमुद्रापार
तिच्या धैर्यात तेज शीतलता कधी शत्रूवर करते वार

समाजाचा आदर्श रमाई, सावित्री, जिजाऊ अहिल्याराणी
त्यागमुर्ती ,कणखर ,धैर्यशील तरीही अधोरेखित कहाणी

हा उंबरठा नाही राहीला आज तरीही वाढती समिक्षा
सुशिक्षित असो अडाणी तिच्या वाढत्या महत्वकांक्षा

नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here