prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “उंबरठा “

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “उंबरठा “

0
6

उंबरठ्याची वेगळी कहाणी
कधी आई बसते तिथे वाट बघत
कधी दिवाही राहतो तिथे जळत
नक्षी रांगोळी ही तिथे दिसते चटक….. १.

उंबराच्या फांदीचा उंबरठा
रक्षण प्रियजनांचा
ऊर्जा ही याची सात्विक
दैवत लाभते घरच्यांना….. २.

उंबरठ्यात लक्ष्मीचा वास
दिवा उदबत्ती लावणे खास
सणवारास गोडाचा घास
लक्ष्मीचा सतत उंबरठ्यात निवास….. ३.

उंबरठा उंबराचा
सात्विकतेचा प्रतीक
संचय सकारात्मकतेचा
प्रसन्नता ही असते अधिक….. ४.

सौ.वर्षा साठे शिंत्रे
पणजी,गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here