
उंबरठा हा ओलांडतांना
स्वप्नं तुझेच होते मनात
सप्तपदी चालून मी आले
आनंद फुलला जीवनात।।१।।
हिळदीचे हे रूप सजले
हातावर होते तुझेच नाव
प्रशांत सागरापरी प्रीत
स्वप्नांत सजले माझे गाव।।२।।
गुणी गोड अशी समिंदर
लक्ष्मीच्याच पावलाने आले
हसत हसत स्वप्नं माझे
नकळतपणे पूर्ण झाले।।३।।
लाठावरती लाटा सुंदर
तुझे आणि माझे गाणे गाते
दरीमधुनी सांज अंबरी
तुझी नि माझी प्रीत वाहते।।४।।
सोन पाऊli सजून केले
प्रत्येकाच्याच मन मंदिरी
तू माझा स्वप्नांतला राजा
मीही तुझीच झाले नवरी।।५।।
देईन तुला अखंड साथ
वचनाला मी बांधून गेले
ओलांडून मी तो उंबरठा
कायम तुझी मी राणी झाले।।६।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे,
लातूर















