prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा

0
51

संस्कारांचे लेणे ल्याले,
घर हे माझे मंदिर झाले
माया-ममतेच्या ओलाव्याने,
नाते मनाचे वृद्धिंगत झाले….

आई-बाबांच्या आशीर्वादाने,
नित्य उजळे ही अंगणवेळ
सुख-दुःखाचा खेळ मांडण्या,
सरे दिवसाचा हा काळवेळ….

​पाऊल टाकता घराबाहेर,
मन थोडेसे कातर होते
जुने पुराणे साचले सारे,
डोळ्यांसमोर मग उभे राहते…

येण्या-जाण्याच्या या वाटेवर,
उभा युगांचा हा उंबरठा
अक्षता आणि कुंकवाचा,
मिरवितो तो खास मोठा….

​कधी लेकीच्या निरोपावेळी,
अश्रूंनी तो ओला होतो,
कधी सुनेच्या स्वागतासाठी,
माप ओलांडून हर्षित होतो…

मर्यादेची रेष आखून,
घराचे रक्षण तोच करतो,
बाहेरच्या या वादळाला,
दारापाशीच तो थोपवतो…

​माणसामाणसांना जोडणारा,
दुवा सुखाचा हा ठरला
परंपरेचा अन संस्कृतीचा,
वसा त्यानेच आजवर जपला…

यशाची शिखरे सर करताना,
पाठीशी असतो हा आधार
उंबरठ्याच्या ओढीनेच,
घराला येतो रोज नवा बहार….

सौ.​अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here