
कावरी बावरी व्याकुळ होऊनी
धेनु हंबरता कधी रानी वनी
धावत येई वासरू साद ऐकुनी
प्रेम तिचे दिसे माया ममतेतूनी
घार हिंडता जरी उंच नभातुनी
पिलास पाहते सदा ध्यान देऊनी
शिकरिस मारिते घाव घालुनी
प्रेम तिचे दिसे, तिच्या दूरदृष्टीतुनी
व्याघ्र संकटास समोर पाहुनी
पाडसास लपविते माता हरिणी
सांभाळीते त्यास कुशीत घेऊनी
प्रेम तिचे दिसे, तिच्या भावनेतुनी
कधी जरी बागुलाचा धाक दावूनी
घास भरवी माय ती संजीवनी
मार्ग दावीतसे, ती संकट दिव्यातूनी
प्रेम तिचे दिसे, तिच्याच प्रतिमेतुनी
करुणा, माया, ममता, यांस लेवूनी
रूप मातेचे अवतरले या भुवनी
ममत्व आईचे, मी जाणता मनी
त्यास रेखिले आज शब्दातूनी
सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)
तळेगांव दाभाडे.
पुणे.
















