prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

0
79

मम कनक चंदन आई
कसा होऊ ग मी उतराई. ll धृ ll

मज आणण्या तू या धात्री
कष्ट अनंत सोशिलेस गात्री,
फळा आली ग आई पुण्याई. ll१ ll

आणीलेस महिवरी जननी
काळ अनेकदा यायचा धावोनी,
लपविलेस प्रेम वनराई. ll२ ll

दुःख अंधार दाटे जेव्हा मनी
देशी ज्ञानप्रकाश हे जाणोनी,
मजसाठी बनसी तू समई. ll३ ll

केले वर्णन जरी अपार
परि फिटणार नाही उपकार,
मनी एकच खेद हा होई. ll ४ll

श्री. नामदेव त्र्यंबक कवळे,
पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here