prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

0
57

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील इतके शब्द नाही
आईसाठी लिहिण्याइतका मी मोठा नाही (१)

आई म्हणजे दातृत्व
आई म्हणजे कर्तुत्व
आई म्हणजे मातृत्व
आई म्हणजे पूर्व जन्माची पुण्याई (२)

आई लेकराची माय असते
आई म्हणजे दुधावरची साय असते
आई म्हणजे धरणीची ठाय असते
आई म्हणजे साता जन्माची शिदोरी असते (३)

आई म्हणजे मायेचे छत्र
आई म्हणजे बुडत्याचा आधार
आई म्हणजे कुंभार
जिने दिला मला आकार (४)

कुटुंबवत्सल असते आई
करते संघर्ष जीवनात
अनेक संकटांशी झुंजताना
दिसते वावरताना विविध स्वरूपात (५)

महेश रामनाथ वैजापूरकर
डोंबिवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here