prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मचं महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई…

प्रबोधिनी मचं महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई…

0
58

विटांच्या त्या ढिगाऱ्यावर,
आई घामाने भिजत होती,
डोक्यावरती ओझं भारी,
कुशीत लेकरू निजत होती.

एका हाताने वीट उचलून,
दुसऱ्याने पाळणा धरते,
स्वतःच्या तुटक्या आयुष्याला,
लेकरासाठी जोडत बसते.

ऊन जरी अंगावर जळतं,
पायाखाली चटके असतात,
आईच्या मायेपुढे पण,
दुःखसुद्धा छोटे भासतात.

भूक तिच्या पोटी असते,
घास मात्र लेकराला देते,
स्वतःच्या डोळ्यात अश्रू ठेवून,
मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते.

रात्रभर ती जागी राहते,
लेकरू शांत झोपावं म्हणून,
स्वतःचं आयुष्य झिजवत राहते,
फक्त लेकरू घडावं म्हणून.

आई म्हणजे जळती वात,
स्वतः जळून प्रकाश देते,
लेकरांच्या छोट्या सुखासाठी,
संपूर्ण आयुष्य वेचून टाकते.

देव दिसला नाही कुणाला,
पण आईमध्ये देव दिसतो,
तिच्या चरणी स्वर्ग सारा,
तिच्या मायेने जीव फुलतो…

सम्राज्ञी संध्या भांगरे
नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here