
आई तुझ्या मायेपुढे,
फिके पडती सारे रंग,
तुझ्या एका हसण्यातच,
दडले आयुष्याचे संग… ॥१॥
रात्रभर तू जागत होती,
माझ्या छोट्या स्वप्नासाठी,
स्वतःच्या वेदना विसरली,
फक्त माझ्या हास्यासाठी… ॥२॥
तुझ्या हातच्या घासामध्ये,
प्रेमाचा गोडवा होता,
तुझ्या कुशीत डोकं ठेवताच,
सारा थकवा हरपता… ॥३॥
देव शोधला मंदिरात,
पण तो कधी दिसला नाही,
आई तुझ्या प्रेमामध्ये,
देवाचीच छाया पाही… ॥४॥
माझ्या प्रत्येक यशामागे,
तुझाच आशीर्वाद आहे,
आई तुझ्या चरणांमध्ये,
माझं खरं सुख राहे… ॥५॥
जग बदलो लाख वेळा,
तू कधी बदलत नाही,
आई तुझ्या प्रेमासारखी,
दुसरी माया कुठेच नाही… ॥६॥
जागतिक मातृदिन आला,
डोळे नकळत भरतात,
कारण आई तुझ्या प्रेमाला,
शब्दही अपुरे पडतात… ॥७॥
स्वरांश स्वरा दिलीप करकरे
माणगाव, रायगड
















