prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई मायेचा सागर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई मायेचा सागर

0
79

आईमुळे आला माझ्या
आता जीवनाला अर्थ
कोणत्याही गोष्टीसाठी
नाही तिच्या मनी स्वार्थ….

माया ममतेने तिचे
आहे हृदय भरून
करी सर्वांवर प्रेम
तरी उरून पूरून….

नसे मनी भेदभाव
तिला सारेच समान
तिच्या पुण्याईने आम्हा
समाजात मिळे मान…

आई नेहमी असते
महागुरू लेकरांची
जबाबदारी निभावते
त्यांना छान घडविण्याची

आई समान दैवत
नाही जगात दुसरा
तिच्या पदरात मिळे
सर्व मुलांना आसरा….

आई नसता घरात
घर उदास वाटते
आई विना लेकरांचे
दु:ख हृदयी दाटते.

लोपामुद्रा शहारे
नागपूर मानेवाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here