prabodhini news logo
Home चंद्रपूर महांकाली कॉलरी व प्रकाश नगर परिसरात चोरी, घरफोडी आणि गांजाच्या प्रकारांत वाढ;...

महांकाली कॉलरी व प्रकाश नगर परिसरात चोरी, घरफोडी आणि गांजाच्या प्रकारांत वाढ; नागरिकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
52

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : महांकाली कॉलरी, प्रकाश नगर, रमाई नगर तसेच चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन परिसरात चोरी, घरफोडी आणि गांजाच्या विक्री व सेवनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी करत परिसरातील नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाढती बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेमुळे काही युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. व्यसनासाठी पैशांची गरज भासल्याने चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन जवळ असल्याने बाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींकडूनही चोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महांकाली कॉलरी परिसरातील कँटिंग चौक येथे पोलीस चौकी असून ती बहुतांश वेळा बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनजवळील बागला चौक पोलीस चौकीत तक्रार घेण्याऐवजी नागरिकांना सिटी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील चोरी, घरफोडी, गांजाची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
यावेळी समाजसेविका तसेच भाजप कार्यकर्त्यांसह वाणी सादालावार, मनीषा ठूनेकर, बुंडू अय्यर्पल्लीवार, सचिन मोहुले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here