Home चंद्रपूर दुर्गराज नारायण रामटेके यांची महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन च्या कार्यकारी सदस्य पदी...

दुर्गराज नारायण रामटेके यांची महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन च्या कार्यकारी सदस्य पदी राज्य संघटने वर निवड.

0
313

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिल, क्रीडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन शी संलग्न चंद्रपुर जिल्ह्यातील एकमात्र मान्यताप्राप्त चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे संस्थापक प्रमुख व सचिव जिमनॅस्टिकस क्रीडा प्रकाराचे जिल्ह्यात सर्वात प्रथम प्रशिक्षण सुरू करणारे कोच दुर्गराज नारायण रामटेके यांची चंद्रपुर जिल्ह्यातून पहिल्यांदाच 25 वर्ष निस्वार्थी,समर्पित कार्य केल्याची पावती व सन्मान म्हणून मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन या राज्य असोसिएशन च्या 17 सदस्यीय कार्यकारणीत वर्किंग कमिटी एक्झिक्युटिव मेंबर रूपाने बिनविरोध निवड

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव व महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे अध्यक्ष आदरणीय संजय शेटे सर(ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक, मुंबई) व महासचिव आदरणीय डॉ मकरंद जोशी सर,(महाराष्ट्र शासन द्वारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित,छत्रपती संभाजी नगर) यांच्या शिफारशीने व सहयोगाने चंद्रपुर जिल्ह्यात विश्वातील सर्व क्रीडा प्रकाराची जननी म्हणून ओळखले जाणाऱ्या जिमनॅस्टिकस क्रीडा प्रकारात नॅशनल व आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिकस खेळाडू निर्माण व्हावे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

दुर्गराज रामटेके यांनी आपल्या निवडीचे सर्व श्रेय मा. संजय शेटे, डॉ मकरंद जोशी, इंद्रजीत सिंग राठोड,आशिष सावंत, संदीप जोशी, डॉ आदित्य जोशी,देवेंद्र राजगुरू, अमेया जोशी, डॉ राजेंद्र शेळके व सर्व वरिष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी यांना दिले आहे.

चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर साठी हा अत्यंत महत्त्वाचा व गौरवाचा क्षण आहे.

दुर्गराज एन रामटेके यांच्या निवडी बद्दल चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे अध्यक्षा सौ शीतल रामटेके, निलेश गुंडावार, ऍड राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवर, ॲड.जयंत टेमुर्डे, ॲड.युवराज धानोरकर,अशोक कामडे, आयुषी रामटेके,संजय माटे ,बी एल करमनकर, करण डोंगरे, राकेश कुमार रॉय, दीक्षांत रामटेके,सुरेंद्र सिंग चंदेल, पांडुरंग भोयर,संदिप पंधरे, डेव्हिड नर्सिस, कृष्णा रामटेके, अमोल बदखल, सुमंत सिंग, मयुर कुलकर्णी,गौतम भगत,पुनम चव्हाण यांच्या सह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू ,पदाधिकारी व समस्त क्रीडा प्रेमी यांच्या द्वारा सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here