Home ठळक बातम्या महिला व बाल विकास विभागातील अधिकारी शोभा शेलार यांची जिल्हा परिषद ठाणे...

महिला व बाल विकास विभागातील अधिकारी शोभा शेलार यांची जिल्हा परिषद ठाणे येथे नियुक्ती

0
99

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन आदेशानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर या पदावर कार्यरत असलेल्या शोभा म. शेलार यांची जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद ठाणे या पदावर बदली करण्यात आली असून त्यांनी आज, दि. १ जून, २०२६ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. शासनाच्या निर्देशानुसार शेलार यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद ठाणे या पदावर रुजू होताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर या पदाचा अतिरिक्त कार्यभारही स्वीकारला आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रातील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा समृद्ध अनुभव असलेल्या श्रीमती शेलार यांनी यापूर्वी विविध पदांवर कार्यरत असताना महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण, पोषण अभियान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंगणवाडी सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीस अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाशी संबंधित उपक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.

जिल्हा परिषद ठाणे प्रशासनाच्या वतीने शेलार यांचे स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल विकास विभागाच्या विविध उपक्रमांना अधिक बळकटी मिळेल तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here