
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन रोहिनी दिल्ली, अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी आपल्या कार्याचा ठसा उमटवत, कमी वयात त्यांची निवड झाली आहे. मा. कु. सायली बाळू ढेबे यांचे सामाजिक कार्य, पत्रकारिता, व्याख्यात्या, कलाक्षेत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई कथक नृत्य सर्टिफिकेट प्राप्त, पोर्ट्रेट रांगोळी कलाकार, साहित्यिका, कवियित्री, शैक्षणिक क्षेत्रातील MyNEP(national education policy)सर्टिफिकेट प्राप्त, तसेच psychology graduation complete, resend Bachlor of physiotherapy डिग्री पूर्ण करत असून विविध क्षेत्रात त्यांची आगेकुच आहे व त्यांचे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजाच्या दिशेने व युवा पिढीकडे एक आदर्श घडविण्यासाठी व योग्य व्यासपीठ निर्माण करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.
हे पद प्रदान करण्याच्या वेळी सर्वात मोठे योगदान हे मा. रवींद्र खेडकर (state secretory of maharashtra) यांनी कार्याची दखल घेत योग्य ते मार्गदर्शनाच्या खाली हे पद देण्यात आले. तसेच मा. श्री राजेश ईश्वरकर (district president of yavatmal, maharashtra) यांच्या कार्याध्यक्षतेखाली संघटनेचा कार्यभार सोपावला गेला.
मा. कु. सायली बाळू ढेबे हिचे केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन रोहिनी, दिल्ली कडून खूप खूप शुभेच्छा व निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.












