
पर्यावरण संरक्षण व संवर्धन ,निसर्ग चक्र ,कचरा विल्हेवाट लावणे ,प्लॅस्टिकवर निर्बंध , जलव्यवस्थापन यासर्व गोष्टींवर अवलंबून असते म्हणूनच पर्यावरण समतोल राखणे आवश्यक असते.
भारत हा विकासाची व कर्तृत्वाची शिडी झपाट्याने चढत असताना पर्यावरणा बाबतीत दुर्लक्षित आहे. पर्यावरणाच्या अहवालात आपण केव्हाच धोकादायक पातळी ओलांडली असल्याचे निरीक्षण समोर आले होते. मात्र यावर गांभीर्याने पाऊले उचलली गेली नाहीत. जगात दरवर्षी प्रसिद्ध होणा-या काही महत्त्वाच्या पर्यावरण अहवालांपैकी एक, अमेरिकेतील मेल विद्यापीठाचे ‘ जागतिक भु – विज्ञान माहिती नेटवर्क केंद्र’ यांनी ‘ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने तयार केलेला २०१४ मधील जागतिक ‘ पर्यावरण कामगिरी निर्देशांक’ ह्या शास्त्रीय जाहीर केलेल्या अहवालात भारताचा क्रमांक जगातील एकूण १७८ देशांत १५५ इतका खाली घसरला असल्याने उत्साहवर्धक नसल्याने धोकादायक सत्य भारताला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धन हे मानवासह सर्व सजातीय अस्तित्वासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अत्यावश्यक व अपरिहार्य असल्याने सर्व विकारनीतीचा तो गाभा बनला आहे. निसर्ग संरक्षण आणि संवर्धन ही आपण आपली संस्कृती मानतो. खरं तर, आपण माणूस म्हणून स्वच्छ तर समाज म्हणून गलिच्छ आहोत हे सत्य स्विकारले पाहिजे. कारण सार्वजनिक जागा, धार्मिकस्थळे, घराभोवतालचा परिसर कसे राखतो यांवर आपले सामाजिक आरोग्य निर्धारित असते. कोणत्याही शहरात, गावात , वसाहतीत ठिकठिकाणी कचरा, उकिरडे , प्रदुषण आपण कायम पाहतो. पर्यावरण रक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण , हरित तंत्रज्ञानाची निर्मिती होत असूनही आपल्याकडे सांडपाणी यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत ,इंधन ,वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प अकार्यक्षम आहेत. नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण रक्षणाच्या सार्वजनिक कामात आपले कर्तव्य आणि योगदान हे विसरता कामा नये. भारताला महान देश बनवण्यात पर्यावरणाचा समतोल राखणे हितकारक ठरेल. पर्यावरणाशी मैत्री करूया.
५ जून रोजी पर्यावरण दिन असल्याने प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जाते. पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी आपले योगदान देणे हे आपले कर्तव्यच आहे. वृक्षारोपण करताना उपयुक्त वृक्षांचेच रोपण करावेत. जेणेकरून पुढच्या पिढीला लाभ मिळेल . वृक्ष ही आपल्याला उन , वारा व पावसामुळे संरक्षण देतात व बचाव करतात म्हणूनच झाडांना आपण आपले मित्र मानतो. वृक्ष आपल्याला फळं, फुले व औषधी वनस्पती म्हणून संजीवनी देखील देतात शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावली , छाया देेत असताात. पण हीच वृक्ष रस्त्याच्या मधोमध असली तर जीवघेणा अपघात घडल्या वाचून राहत नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडावर कार धडकून अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यांत . याचबरोबर मधोमध असलेल्या वृृक्षाांंमुळे वाहतूक कोंडी देखील होत असते. . काही जणं आपली वाहने झााडाखाााली लावून जातात.. झाडे जीर्ण असल्याने वाहनावर पडून वाहनांचे नुकसान होते. कोणती वेळ काय दुर्घटना घडवेल हे सांगता येत नाही. मग अशा झाडांची मुळं आतून पोकळ झाल्याने कोसळून खाली पडते आणि झाडाखाली उभी केलेली वाहनांची मोठया प्रमाणात नुकसान होते. परिणामी काही जणं जखमी देखील होतात. जागे अभावी आपण वाहने झाडाखालीच लावतो आणि निर्धास्त राहतो परंतु अशा घटनांपासून बोध नकनक्कीच घ्यावा. वाारंवार अशा अपघात रोखण्यासाठी महापालिकेने आता तात्पुरता उपाय म्हणून रिफ्लेक्टर, तसेच झाडाला टायर लावून . तोडगा काढला आहे. जिवितहानी घडली जाते तेव्हाच उपाययोजना व तोडगा काढला जातो ही तर खेदजन्य बाब आहे. धोकादायक झाडाांचा प्रश्न म्हणजे समस्याा उपस्थित करणारा आहे. वृक्ष ही जीवन देतात पण जीव देखील घेतात हेही तितकेच खरे आहे. वृक्षारोपण करताना कोणालाहघ अडथळा वा अडचण होणार नाही अशा मोकळ्या जागेत झाडी लावावीत जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही तसेच झाडांचे संवर्धन , जतन चांगले होईल….
सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
नाशिक















