
खरं प्रेम मिळायला
नशीब लागत नेहमी
शब्दाचा पलिकडचे
विश्व इथे नसते गुलामी
एकमेकांनप्रती असतो
आदर विश्वासाचं
म्हणून प्रेमाला दर्जा
मिळतो आपुलकीचा
माझे तुझे म्हणण्यात
रस नसते काही
आपलेच सारे
विचारात राही
असतो प्रेमात जिव्हाळा
ओढ असते नात्याची
हरतो आणि जिंकतो कोण
माळ असते ही मोत्याची
एक एक मणी सारे
असतात विश्वासाची धागे
तुटू देऊ नये कधीही
जपावे दोघेही एकमेका सांगे
प्रेमाची परिभाषा
दैवाचे देतात स्थान
म्हणूनच प्रेमाला
जगात आहे खूप मान
रंजना भैसारे
नागपूर















