
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर द्वारा सीडीसीसी बँक सभागूह, चंदपूर येथे आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबीरात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे *जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे* यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा विधानसभेचे *आमदार मा. श्री. करणभाऊ देवतळे* यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष मा. डॉ. विजयराव देवतळे, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य मा. धनजय चाफले, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. पुंडलिक पाल, प्रमुख अतिथी राजुराचे नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे, मा. प्रा. पंकज नरुले, माजी सभापती मा. डॉ. आसावरी देवतळे, मा. मनोज कळसकर, मा. डॉ. बी. के. लोणारे, मा. डॉ. राजीव धानोरकर, मा. डॉ. भालचंद्र फलके, मा. डॉ. विरेंद्र कोल्हे, मा. हॉ. ऋषीकेश कोल्हे, मा. रोहीणी वाकुडकर, मा. नामदेव लढी, मा. दिनकर ठोंबरे यासह खैरे कुणबी कर्मचारी पुरुष बचत गट, चंद्रपूर, समस्त तालुका स्तरीय खैरे कुणबी समाज संघटना जिल्हा चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














