
कृष्णा चव्हाण
जीवती प्रतिनिधी
आज धाराशिव विधानसभा क्षेञातील मौजे खेड आणि खामगाव या गावात पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष, तेलंगाणा राज्याचे मुख्यमंञी केसीआर साहेब यांच्या मार्गदर्शनात, सर्वसामान्यांच्या हक्काच व्यक्तिमत्व, मराठवाडा विभाग प्रमुख आदरणिय सोमनाथ थोरात यांच्या नेतृत्वात, खेड आणि खामगाव गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात सदस्य नोंदणी करून अभियानात सहभाग घेतला.
माननीय सोमनाथ दादा थोरात यांनी बीआरएसचे विचार व शेतकरी संवादात पुढाकार घेतला. बीआरएसच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा ध्वज घराघरात पोहचविन्यासाठी महत्वपुर्ण पाऊल ऊचलले. शेतकरी, शेतमजुर, दलीत, महिला, युवक, विद्यार्थी यासाठी तेलंगाणात ज्या योजना राबवल्या आहेत,त्याच योजना महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर राबवल्या जातील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी गावचे अनेक माजी सरपंच ग्रापंचायत सदस्य, वारकरी सांप्रदायाचे सर्व वारकरी मंडळी, शेतकरी,सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ युवकांसह , आक्रमक व्यक्तिमत्व विधानसभा समन्वयक रामजीवन बोंदर, राजू कामतीकर, संजय भिशे, रामराजे गराड,रणजित लोमटे, बालाजी चव्हान, अभिजित गरड, शाम गरड, तुकाराम भुसारे,राजेंद्र गरड, सौदागर चव्हाण , उत्तम गरड, हनुमंत शिनगारे, चंद्रकांत शिंगारे, प्रताप शिनगारे, प्रवीण शिनगारे, पांडुरंग शिंनगरे पोपट शिनगारे, राजाभाऊ माने, छोटू पाटील बीआरएस सदस्य उपस्थित होते














